पान:रुपया.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




[ ४७ ]

रुपये असण्याची जरूर राहणार नाही. अशा रीतीने हल्लींचा पुष्कळ घोंटाळा कमी होईल. कमी किमतीचे नाणे वापरून जागा अडवून टाकणे व तासच्या तास रुपये मोजीत बसणे इत्यादि कंटाळवाळे व 'फुकट दिक्काल यांचा अपव्यय करणारे प्रकारही नाहींसे होतील.

 हल्लीच्या पद्धतींत रुपया हेच मुख्य नाणे आहे असे झटले पाहिजे. कारण रुपये देऊन पौंड मिळणे हे ऐच्छिक असल्यामुळे, रुपयाची पौंडांत अदलाबदल होईल असा नियम नाहीं. पौंड दिला असतां मात्र रुपये मिळालेच पाहिजेत. शक्य तितका पौंड देण्याचा प्रयत्न सरकार करते; परंतु पुष्कळ वेळां पौंड नसल्यामुळे सरकारास तसे करणे शक्य नसते. संकटाचे वेळी रुपये दिले असतां, पौंडामध्ये लिहिलेली लंडनवरची उलट हुंडी (Reverse Council) देण्यास सरकार चेहमी तयार असते. तथापि हे करण्यास सरकार कायद्याने बांधलेले नाही. अशा रीतीची रुपयांची कायदेशीर स्थिति आहे. रुपयाची किंमत पौंडांत १६ पेन्सांपेक्षा जास्त झाल्यास, पौंड आणून रुपये मागणे शक्य असते. त्यामुळे १६ पेन्सही हल्लीच्या पद्धतीत रुपयाच्या किंमतीची वरची मर्यादा आहे. त्याचप्रमाणे रुपयाची किंमत १६ पेन्सचे खाली गेल्यास, सरकार एका रुपयास १५.२९/३२ पेन्स देते ; त्यामुळे ही रुपयाच्या किंमतीची खालची मर्यादा आहे.