पान:रुपया.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




[ ४६ ]

आतां हे सर्वच रुपये हिंदुस्थानांत राहिले असे म्हणता येत नाहीं. कांहीं रुपये अफगाणिस्थान, तिबेट, नेपाळ इत्यादि परकी मुलुखांत जातात. कांहीं अटविले जातात ; तथापि त्यांची संख्या कळण्यास मार्ग नसल्यामुळे, हे आंकडे गृहीत धरूनचे चाललें पाहिजे. वरील कोष्टकांत १९०० पासून १९१२ पर्यंत चलनांत रुपये किती आहेत याचा अंदाज दिला आहे.

 या १८४ कोटींपैकी नऊ कोटि अफगाणिस्थान इत्यादि देशांत गेले असे धरले तर १९१२ मध्ये १७५ कोटि रुपये चलनांत होते असे सिद्ध होते. १९०० मध्ये जितके रुपये चलनांत होते, त्यापेक्षा जवळ जवळ दीडपट रुपये १९१२ सालीं चलनांत होते.

 हिंदुस्थान देश मोठा आहे हे लक्षात ठेविलें तरीसुद्धा हे चलन इतर देशांच्या मानाने फारच आहे यात शंका नाहीं. बँकिंगची पद्धति इंग्लंडच्या तऱ्हेवर येथे प्रस्थापित केल्यास, यापैकी निम्में चलन वाचण्यासारखे आहे. विशेषतः चेक जास्त वापरले पाहिजेत व त्याकरितां प्रत्येक जिल्ह्यांत इंपीरियल बँकेची एक शाखा उघडली पाहिजे.

 सोन्याचे नाणे केल्यास व एकचलनपद्धति स्वीकारल्यास असा नियम करावा लागेल की, पन्नास किंवा शंभर रुपयांवर कोणतेही देणे देण्याचे असल्यास, ते सोन्याचे नाणे किं त्यावर आधारभूत अशा नोटा यांमध्येच दिले पाहिजे. असा नियम केल्यावर, रुपये फक्त मोड या नात्याने वापरले जातील ब चलनांत ५० कोटींच्यावर जास्त