पान:रुपया.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

<br>

[ ४३ ]

असल्यास ते देऊन रुपये मागतां येतात व हे देण्यास सरकार कायद्याने बांधले गेले आहे. दुसरा मार्ग नोटा देऊन रुपये घेणे. हेही सक्तीचे असते. ज्याअर्थी नोटांवर मी तुम्हाला देखत अमुक रुपये देईन' असे लिहिले असते, त्याअर्थी ते शब्द खरे करणे सरकारास भाग आहे ; नाहीं तर नोटांवरील लोकांची श्रद्धा उडून जाईल. या कामाकरितां जे रुपये ठेवितात, ते नोटांचा रिझर्व्ह असतो त्यांत ठेवितात (प्रकरण ६ पहा.). तिसरा मार्ग म्हणजे कौन्सिलबिल दाखवून रुपये मागतां येतात (प्रकरण ५ पहा). असे तीन प्रकार असल्यामुळे, रुपये किती पाडावे हे या तीनही प्रकारांच्या वस्तूंच्या संख्येवर अवलंबून आहे. सॉव्हरिन जास्त आल्यास व ते लोक खजिन्यांत किंवा टांकसाळींत आणतील असा संभव आल्यास, रुपये जास्त पाहिजेत व ते खजिन्यांत नसल्यास पाडले पाहिजेत. नोटा जास्त काढल्यास रुपयेही जास्त पाहिजेत (प्रकरण ४ पहा). त्याचप्रमाणे कौन्सिलबिलें जितक्या रुपयांची विकलीं, तितके रुपये हिंदुस्थानात तयार ठेविले पाहिजेत. अशा रीतीचा अंदाज करून, जितके रुपये पाडणे जरूर असते, तितके रुपये सरकार पाडते.

 हिंदुस्थानांतील व्यवहार लहान लहान रकमेचे असल्यामुळे, रुपये हेच मुख्य चलन असते. मोठ्या रकमा देण्याकरितां मात्र नोटा किंवा पौंड यांचा उपयोग करता येतो. त्यामुळे पुष्कळ वेळां लोकांस नोटा देऊन रुपये घेणे भाग पडते. शिवाय अनेक प्रांतांत लोक आपल्या पिकांऐवजी रुपयांशिवाय कांहीं घेत नाहीत