पान:रुपया.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ४४ ] त्यामुळे त्यांना देण्याकरितां लाखों रुपये जमा करावे लागतात. वस्तुतः ही स्थिति शोचनीय आहे. अशा रीतीने लोकांजवळ कोट्यवधि रुपये पडून राहतात व देशाचे नुकसान होते; परंतु बँकिंगची प्रगति होईपर्यंत ही स्थिति अशीच राहणार. पुष्कळ लोक हजारों रुपयांचे देणे सुद्धा रुपयांत देतात. वस्तुतः हा चूक आहे अशा व्यवहाराकरितां नोटाच वापरणे उत्तम आहे । परंतु लोकांमध्ये, मोठी शहरे वगळली असतां, नोटांविषयी विश्वास अद्याप उत्पन्न झाला नाहीं. तथापि हलके हलके का होईना; नोटांची लोकप्रियता वाढत्या प्रमाणावर आहे. यांत संशय नाही. हल्लींसुद्धां कित्येक जिल्ह्यांत खेड्यापाड्यांत सुद्धां लोक नोटा वाप रतात असे दिसून येते. चलनांत रुपये किती आहेत याचा अंदाज करणे हे फार कठिण आहे तथापि पुष्कळ परिश्रम करून कांहीं अधिका-यांनी अंदाज केला आहे ते पुढील कोष्टकांत दिलेला आहे. हे आंकडे कोटींचे आहेत: | मि० हॅरिसन याचा. ११५ १८८१-१८८५ १८८५-१८९० १८२ ०-१८९५ १८९५-१९० 'मि. अंडी यां, मि० अॅटकिन सन यांचा. । . १३६ १५० १७० ११५ १७८ १८९ १०९ १११ ९०० १२० १९०१..