पान:रुपया.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




[ ४० ]

तात. या रकमेचे सोने घेऊन हिंदुस्थानांत पाठविल्यास, एक पौंड मिळविण्याकरितां १५ रुपयांपेक्षा जास्त खर्च येतो. हिंदुस्थानांत नक्की पंधरा रुपये दिले म्हणजे एक पौंड मिळतो. अशा रीतीनें सरकारी खजिना म्हणजे सोने विकत घेण्याचे साधन होऊन बसते ही गोष्ट अनिष्ट आहे. कारण पौंडांचा उपयोग या कामाकरितां करणे हे मूलहेतूचा विपर्यास करणे होय. अशा रीतीने हल्लीच्या चलनपद्धतीचा फायदा घेऊन सोन्याचे व्यापारी सोने स्वस्त देण्यास सरकारास भाग पाडतात.

 सोने रुपे यांचा संचय करण्यांत हिंदुस्थानांतील लोक आपली संपत्ति खर्च करितात असे यूरोपियन ग्रंथकारांचे. म्हणने आहे: सोनें चलनांत जास्त आणल्याने, या प्रवृत्तीस आळा बसण्या ऐवजी उलट मदत होते. होईल तितके सोने व रुपें चलना काढून शक्य तेवढा व्यवहार नोटांच्या सहाय्याने करावा. हा विषय अतिशय क्लिष्ट असल्यामुळे, या स्थळी त्याचे पूर्ण विवेचन करणे शक्य नाही. तथापि दोन तीन मुद्दे येथे देणे जरूर आहे " निर्यात माल आयात मालापेक्षा जास्त असल्यामुळे, हिंदुस्थान हा नेहमीं धनको देश असतो. होमचार्जेस' चे पैसे देऊन तीस कोटि चाळीस कोटि रुपये हिंदुस्थानास घेणे असतात. रुपये सोन्याच्या रूपांत घेणे हा आमचा हक्क आहे व यासंबंधाने लोकांनी तक्रार करणे हे अप्पलपोटेपणाचे आहे. आतां दागिन्या ऐवजी इतर सुखोत्पादक वस्तूत जास्त पैसे घातले असतां हितकर