पान:रुपया.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




[ ३९ ]

आतां पौंड करन्सीऑफिसमधून जातात केव्हां व येतात केव्हां व कोणत्या कारणाकरितां हे पाहूं. नोटा किंवा रुपये हे हिंदुस्थानांत पाठविण्याचे दोन मार्ग आहेत. एक कौन्सिलबिल इंग्लंडांत विकत घेऊन पाठविणे (प्रकरण ५ पहा.) किंवा कौन्सिलबिल महाग असल्यास, सॉव्हरिन पाठविणे. ज्या वेळेस कौन्सिलबलांचा भाव तेजीत असतो, त्या वेळेस यूरोपांतील रिणको हिंदुस्थानांत सॉव्हरिन पाठवितात. नंतर हे खजिन्यांत येऊन लोक त्यांच्या मोबदला नोटा किंवा रुपये नेतात. त्याचप्रमाणे लोकांना चलनाकरिता किंवा संचयाकरितां सोने पाहिजे असेल त्या वेळेस ते नोटा किंवा रुपये देऊन पौंड नेतात. अशा रीतीनें खजिन्यांतील पौंड कमी होतात. कधी कधीं सोन्याचा भाव अधिक झाल्यास, रुपये देऊन पौंड घेणे व ते अटविणे हे फायदेशीर पडते. अशा रीतीनेही पुष्कळ प्रसंगी पौंड खजिन्यांतून नाहीसे होतात. काँपट्रोलर जनरलच्या अहवालांवरून असे दिसते की, तेजीच्या मोसमांत पुष्कळ पौंड बाहेर जातात व मंदीच्या मोसमांतही पुष्कळसे बाहेर जातात. तेजीच्या वेळेस चलनाची फार जरूर असते त्यामुळे हे पौंड चलन म्हणून वापरीत असले पाहिजेत ; परंतु उन्हाळ्यांत मंदीच्या वेळी जे पौंड देतात, ते सोने समजून वितळण्याकरितां लोक नेतात असे अनुमान आहे. कारण त्यावेळीं लंडनवरच्या हुंड्यांचा भाव कमी असतो म्हणजे एक रुपया देऊन फक्त १६ पेन्स लंडनमध्ये मिळ