पान:रुपया.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




[ ३८ ]

आल्यापासून दहा रुपयांच्या नोटा कमी होऊ लागल्या. बंगालमध्ये नोटा पहिल्यापासून लोकप्रिय असल्यामुळे, पौंडांचे चलन जास्त वाढलें नाहीं. यावरून असे अनुमान निघतें कीं, पौंड व नोटा यांमध्ये विशेष स्पर्धा असते. एवंच पौंड चलनांत आणल्यास, रुपये बाजूला सारून त्यांचा उपयोग लोक करतील असे गेल्या वीस वर्षांच्या अनुभवावरून संभवनीय दिसत नाही.

 हल्लीचीच पद्धति कायम ठेवल्यास, सोन्याच्या नाण्याच्या ऐवजीं नोटा चलनांत ठेवण्यांत एक फायदा आहे. तेजी व मंदी असे दोन मोसम प्रत्येक प्रांतांत असतात. अशा तेजीच्या मोसमांत चलन जास्त लागते. हे चलन सोन्याचे नाणे केल्यास चलन वाढविण्यास जास्त कठिण पडेल; परंतु नोटा या वाटेल तेव्हां खजिन्यांतील शिलकींतून लोकांस देतां येतात. ऑक्टोबरपासून डिसेंबरपर्यंत लोक सॉव्हरिन देऊन नोटा घेतात. नंतर जानेवारीपासून एप्रिलमध्ये त्याच नोटा मंदीच्या मोसमात परत करतात; परंतु नोटांच्या ऐवजी पौंड लोकांनी नेल्यास, परत येतील किंवा नाही हे सांगता येत नाही. हे पौड अटवून चलनांतून बाहेर गेल्यास, पुनः तेजीच्या मोसमांत नवीन पाडावे लागेल; परंतु नोटांना अशा प्रकारचे भय नसते का जास्त पौंड चलनांत आणल्याने विशेष प्रकारची अस्थिरता व चलनांत उत्पन्न होते हे निर्विवाद आहे; परंतु या सर्वाला उपाय सोन्याचे चलन सुरू करणे हाच होय,