पान:रुपया.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




[३७ ]

सोन्याचे केल्यावर मग त्याचा कांहीं भाग तरी सरकारी निधींत आलाच पाहिजे व तो हुंडणावळ प्रतिकूल झाली असतां वापरण्यास पुरेसा होईल. सुवर्णसंलग्न चलन चालू आहे तोपर्यंत चलनांत सोन्याचे नाणे जास्त वाढविल्यास विशेष फायदा होणार नाही, हे आक्षेपकांचे म्हणने आम्हास कबूल आहे. कारण अशा रीतीनें पौंड सर्व देशभर पसरले जाऊन हिंदुस्थानांत बँकिंगची पद्धति बाल्यावस्थेत असल्यामुळे, ते एकत्र कोठेतरी जमणे शक्य होणार नाहीं.

 आतां सोन्याचे नाणे चलनांत येऊन त्याच्यायोगाने रुपये कमी झाल्यास काय होईल हे पाहिले पाहिजे. पौंड चलनांद जास्त आल्यास, रिझर्व्ह'ला जास्त किंमत येईल. हल्ली रिझर्व्हमध्ये बहुतेक रुपये असल्याने व त्यांची किंमत कृत्रिम असल्याने, परकीय देशांतील देणे देण्याच्या दृष्टीने रिझर्व्ह कमकुवत राहते. तोच रिझर्व्ह त्यापैकी ३/४ भाग पौंडांमध्ये असल्यास जास्त उपयोगी होईल. असे करण्याकरितांच पांच चार वर्षे पौंड चलनांत आणण्याचा सरकारने प्रयत्न केला; परंतु त्याचा परिणाम असा दिसून आला की, रुप्याचे नाणे हे चलनांतून कमी न होता, उलट आपल्या हातांत आलेले पौंड खजिन्यांत देऊन लोक रुपये घेऊ लागले. कांहीं ठिकाणी पौंड हे चलनांत आले; परंतु त्यायोगाने नोटांचे चलन कमी झाले. पंजाबमध्यें पौंड चलनांत