पान:रुपया.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही




( ३६ )

रूपाने सरकारजवळ असणे श्रेयस्कर आहे; परंतु यावरून एवढेच सिद्ध होते की, हल्लीची पद्धति कायम ठेवल्यास, सोन्याचे नाणे जास्त प्रमाणावर चलनांत ठेवणे घातक आहे; परंतु इंग्लंडप्रमाणे सुवर्णेकचलनपद्धति अमलात आणल्यास या म्हणण्यात मुळीच तथ्य राहत नाहीं.

 दुसरा आक्षेप असा आहे कीं, सोन्याचे नाणे चलनांत आणिल्यास, एकंदर चलनपद्धति जास्त अस्थिर व संकटकाली दगी देणारी अशी होईल. हल्ली सरकारजवळ जे सुवर्णनिधि असतात त्यांत पुष्कळ सोन्याचे नाणे असते व ते संकटांत उपयोगी पडते. आतां. यांपैकीं पुष्कळसे नाणे लोकांच्या हातांत गेल्यास, तें जरूर लागेल तेव्हां सरकारी खाजिन्यांत येणे हे शक्य आहे की काय लॉर्ड गॉशन यांनी एके ठिकाणी म्हंटले आहे, लोकांच्या हातांत ४५ कोटि सॉव्हरिन असण्यापेक्षा, बँक ऑफ इंग्लंडमध्ये तीस कोटि असलेले मी जास्त पसंत करतो. हेच तत्व लावल्यास, या आक्षेपांत थोडे तथ्य आहे असे दिसून येईल. एक दर चलनपैकी फक्त १/५ सोन्याचे नाणे असेल तर संकटाचे वेळी सरकारच्या हातांत त्यापैकी चौथा हिस्साही येणे कठिण आहे: म्हणून रुपये व पौंड हे दोनही चलनांत असल्यास, सोने से मुख्यत्वेकरून सरकारी खजिन्यांतच असणे हे आवश्यक आहे.

 या आक्षेपास उत्तर एवढेच कीं, सेान्याचे चलन येथे करावयाचे नाही अशा कल्पनेवर रचलेला हा आक्षेप आहे. सर्वत्र नाणे