पान:रुपया.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



(३५)

चलन कमी करणे हे चांगले नाही. हे सर्व हल्लींची पद्धति कायम ठेवावयाची या गृहीतकृत्याप्रमाणे खरे आहे; परंतु सोन्याचे चलन असावे असे प्रतिपादन करणारे रुपयांच्या नोटांच्या ऐवजी सोन्याच्या नाण्यावर आधारभूत अशा नोटा काढाव्या असे म्हणतात. असे केल्यावर नोटांचे चलन कमी होईल असें म्हणने अगदीच हास्यास्पद आहे. कारण पांच पौंड, दहा पौंड, पन्नास पौंड अशा नोटांची व सोन्याच्या नाण्यांची स्पर्धा होणे मुळीच शक्य नाहीं.

 आतां, सुवर्णसंलग्नचलन कायम ठेवून सोन्याचे नाणे अधिक केल्यास, सोने व हल्लीच्या नोटा यांमध्ये स्पर्धा होईल हे खरे आहे. चलनांत सोने जास्त झाल्यास, नोटा कमी होतील व त्यामुळे नोटांचा रिझर्व्हही कमी होईल. रुपये कमी झाल्यास, गोल्ड स्टैंडर्ड रिझर्व्ह कमी होईल. आतां हुंडणावळ हिंदुस्थानच्या विरुद्ध झाल्यास, यूरोपांत पैसे पाठविण्याकरितां जें सोने लागेल, ते चलनांत असलेल्या नाण्याच्या रूपाने एकत्र करितां येईल किंवा नाही हा प्रश्न आहे. अशा प्रसंगी बहुतकरून लोक सोन्याचे नाणे जवळ ठेवून सरकारी खजिन्यांत रुपये देतील असा जास्त संभव आहे. अशा वेळीं सरकारजवळचे दोनही सुवर्णनिधि अल्प असल्यास, बाहेरच्या देशांतील देणे भागविणे हे काम कठिण होईल. तेव्हां हें सोने चलनांत न ठेवितां, एकत्र निधींच्या