पान:रुपया.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




(३४)

नाणी बाहेरच्या देशांत पाठविल्यास, त्यांची किंमत काय होईल हे निश्चित सांगता येणार नाही. शिवाय सॉव्हरिन हा ब्रिटिश साम्राज्याच्या बाहेरही जास्त परिचित असल्यामुळे, तेच नाण हिंदुस्थानाने स्वीकारणे जास्त इष्ट आहे. लोकांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्यावर पौंड लादल्यास, ते घेतांना लोक बटाव मागू लागतील व रुपयांना त्यांच्या किंमतीपेक्षा जास्त भाव येईल व अशा रीतीने सोन्याच्या नाण्याची अवनति होईल,

 आतां चलनांत सोन्याचे नाणे ठेवण्याच्या विरुद्ध जे आक्षेप घेतलेले आहेत, त्यांचा विचार करूं. पहिला आक्षेप असा आहे कीं, चलनांत सोन्याचे नाणे ठेवणें हें खर्चाचे असून, यायोगाने कारण नसतांना कोट्यवधि रुपयांचे सोने बिनव्याजी अडकून राहते. गेल्या दहा वर्षांत रुप्याच्या नाण्यापासून झालेला फायदा ब नोटांच्या रिझर्व्हमधील सिक्यूरिटी यांचे व्याज मिळून एक, दर पंधरा कोटि रुपये जमले आहेत. हा सर्व फायदा सोन्याचे नाणे केल्यास नाहींसा होईल. यावर उत्तर असे आहे की सोन्याचे नाणे व त्याच्या आधारावर काढलेल्या नोटा यांपासून हा फायदा होईलच. नोटांच्या रिझर्व्हमध्ये कांहीं सोन्याचे ना ठेवून बाकीचा रिझर्व्ह सिक्यूरिटीच्या रूपाने ठेवता येईल. शिवाय कृत्रिम किंमतीच्या रुपयापासून झालेला फायदा हा कुचकामाचा आहे. चलनपद्धति दोषयुक्त ठेवून त्यापासून फायदा मोजण्यात कोणता अर्थ आहे. सोन्याचे नाणे काढून रुपयांच्या नोटांचे