पान:रुपया.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



( ३३ )

इंग्लंडांतुन पौंड मागविणे किंवा सोने आणून येथे नाणे पाडणें यांत फायद्याच्या दृष्टीने कांहींच फरक नाहीं. हे पाडलेले नाणे लोकांस नकोसे झाल्यास, ते देऊन पुनः नोटा किंवा रुपये घेण्याचा अधिकार असल्यामुळे, सोने चलनांत ठेवणे हे लोकांच्या इच्छेवर राहील दुष्काळांत लोकांनी सोने देऊन नाणी घेतल्यास, शेवटीं तीं नाणीं आयात मालाचे देणे देण्याकरितां सरकारचे मार्फत परत इंग्लंडांत पाठवावी लागतील.

 अशा रीतीने हिंदुस्थानांत टांकसाळ उघडल्यास विशेष फायदा होणार नाहीं हे सर्व खरे आहे; परंतु याचे कारण हल्लींची पद्धति आहे. हल्लीची पद्धति म्हणजे सुवर्णसंलग्नचलन ठेविल्यास, येथे टांकसाळ काढून फायदा होणार नाही. कारण रुपये हे वाटेल त्या प्रमाणांत कायदेशीर चलन असल्यामुळे, पौंड देऊन लोक रुपये मागतात; परंतु पन्नास किंवा शंभर रुपयांच्यापेक्षा जास्त देणे असल्यास, सोने किंवा सोन्याच्या नाण्यावर आधारभूत अशा नोटा दिल्याच पाहिजेत असा नियम केल्यास, वरील सर्व आपत्ति टळतील. टांकसाळ उघडल्याबरोबर हजारों तोळे सोने बाहेर काढून लोक त्याची नाणी घेतील. त्याचमाणे हल्ली पौंड सरकारकडे येण्याचा क्रम आहे तो बंद होऊन लोकांस पौंड वापरणे भागच पडेल.

 दहा रुपयांचे सोन्याचे नाणे जास्त लोकप्रिय होईल; परंतु त्याच्या योगाने चलनांत आणखी घोंटाळा उत्पन्न होईल. हीं