पान:रुपया.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




(३२)

आले. याचे कारण असे होते की, ऑस्ट्रेलियांतून वे इजिप्टेमधून पौंड येथे पाठविणे हे सोन्याचे गट पाठविण्यापेक्षां किंवा कौन्सिलबिले खरेदी करण्यापेक्षां स्वस्त पडत होते. या कारणामुळे इंग्लंडांतील व्यापाऱ्यांनी हिंदुस्थानचे देणे देण्याकरितां या मार्गाचा अंगिकार केला; परंतु यावरून हिंदुस्थानांतील चलनांत हे सर्व पौंड गेले असे अनुमान करणे चुकीचे होईल. प्रो० कीन्सच्या मताने हे पौंड चलनांत न जातां, लोकांनी सोन्याच्या गटाप्रमाणे वापरले.

 एकंदरीने पाहतां, पौंड हे चलनांत राहण्यापेक्षां संचय करून ठेविले जातात असे १९१२ पर्यंतच्या अनुभवावरून दिसते. पौंडांचे चलन जास्त वाढविण्याकरितां कांहीं लोकांनी पुढील माग सुचविले आहेतः–हिंदुस्थानांत टांकसाळ उघडणे, १० रुपयांचे सोन्याचे नाणे पाडणे व लोकांच्या इच्छेविरुद्ध प्रत्येक व्यवहारात पौड देणे. आतां टांकसाळ उघडल्यास, तेथे सोने कोठून येईल ते पाहू. ज्यांनीं सोने मागविले आहे, त्यांना ते नकोसे झाल्यास ते नाणी पाडून घेतील. कांहीं लोक नाणी पाडण्यासाठी इंग्लंडांनतून सोने मागवितील, हिंदस्थानांतील सोन्याच्या खाणी आपलें सोनें टांकसाळीकडे पाठवितील. लोक आपले दागिने किंवा सोन्याचे गट हे नाणी पाडण्याकरितां आणतील. यापैकी मुद्दाम इंग्लंडांतून सोने मागविण्याचा संभव कमी आहे. कारण