पान:रुपया.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




( ३१ )

असते. त्याचप्रमाणे ज्यावेळेस हुंडणावळीचा भाव उन्हाळ्यात कडक होतो म्हणजे १ पौंडाची हुंडी मिळण्यास, १५ पेक्षा जास्त रुपये द्यावे लागतात, त्यावळेस सरकारी खजिन्यांतून सॉव्हरिन घेणे हे फायदेशीर होते. या मार्गाने पुष्कळसे सॉव्हरिन चलनातून नाहीसे होतात. इतके असूनही पुष्कळसे पौंड चलनामध्ये आहेत; परंतु ते संचय करून सांठवून ठेविण्याकरिता वापरले जातात असे सरकारी अधिकाऱ्यांचे मत आहे.

 आतां पौंड खरोखरी चलनांत आहेत किंवा नाहींत याविषयी कांहीं प्रत्यक्ष पुरावा आहे किंवा काय हे पाहूं. १९०८ मध्ये पोष्टांत १ लक्ष पौंड आले. १९११ साली १३।१४ लक्ष पौंड पोष्टांत आले. त्याचप्रमाणे १९११ सालीं रेल्वेवर १२ लक्ष सॉव्हरिन कंपन्यांना लोकांनी दिले. १९०९ व १९१० मध्ये फारच थोडे पौंड पोस्ट व रेलवे यांच्या हातांत आले. यावरून १९०८ मध्ये ते वितळले गेले असा तर्क आहे. बंगाल, आसाम, मध्यप्रांत, ब्रह्मदेश या प्रांतांत पौंड विशेष चलनांत नाहींत. मद्रास व संयुक्तप्रांत येथे त्यांचा जास्त प्रचार आहे. पंजाबमध्यें पौंड फारच लोकप्रिय झालेले आहेत; परंतु त्यांपैकीं पुष्कळसे संचयामध्ये पडून राहतात असा अंदाज आहे. त्यामुळे हुंडणावळ हिंदुस्थानच्या विरुद्ध झाल्यास, यूरोपांत पाठविण्याकरितां त्यांचा उपयोग होईल असे समजू नये. १९१२ मध्यें, अदमासे ४५ कोटि रुपयांचे सोने (यापैकी ३१ कोटि पौंड होते ) हिंदुस्थानांत