पान:रुपया.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




(३०)

हे सर्व आंकडे हजारं वगळून दिले आहेत, म्हणजे प्रत्येकापुढे तीन शून्ये द्यावयाची. हे सर्व रुपये आहेत.

 कोष्टकांचे स्पष्टीकरणः–कोष्टक १ हे कोष्टक २ + कोष्टक ३ यांची बेरीज करून आलेले आहे. लोकांच्या हातांतील सोने व खजिन्यांतील सोने मिळून एकंदर पडलेली भर आहे. काष्टक ४ व ५ ही कोष्ठक ३ चे विभाग आहेत. एकंदर लोकांच्या हातांत गेलेल्या सोन्याचे, सोन्याचा गट + सॉव्हरिन असे विभाग केलेले आहेत. दुसऱ्या कोष्टकांत (उणे) अशी खूण तिचा अर्थ असा की, खजिन्यांत सोने जास्त न येतां, उलटे कमी झालें व ते देशाच्या बाहेर पाठविले गेले.

 तिसऱ्या कोष्टकांत दिलेल्या आंकड्याची सरासरी केली असता असे दिसते की, दरसाल अदमासे वीस कोटि रुपयांचे सोने लोकांजवळ नवीन येते. शेवटच्या कोष्टकांत लोकांच्या हातात किती पौंड येतात हे दिलेले आहे. या पौंडांपैकी खरोखरच किती राहतात व दागिन्याकरितां किती आटवले जातात हे सांगतां येणे शक्य नाही. त्याप्रमाणे पुरून ठेविलेले किंवा व काढून ठेविलेले असे किती आहेत हेही समजण्यास साधन " कांहीं सॉव्हरिन दिसण्यास सुरेख असल्यामुळे, लोक ते भूषणांप्रमाणे वापरतात.साचा:Paragragh break  सॉव्हरिन अटविण्याचे कारण असे आहे की, थोडक्या प्रमाणात सोने लागल्यास, सॉव्हरिन अटविणे हेच सगळ्यांत सोपे