पान:रुपया.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



( २७ )

हाच उत्तम पक्ष आहे असे पुष्कळ तज्ज्ञांचे मत आहे. रिकार्डो, मिल, गॉशन इत्यादि अर्थशास्त्रज्ञांनीही अशाच तत्त्वाचे प्रतिपादन आपल्या ग्रंथांत केले आहे. वरील तत्त्वाचा अवलंब करून, हल्ली सोन्याचे चलन ज्यांनी अमलात आणलेले आहे, ते देश सुद्धां सोने खरोखरी चलनांत कमी राहील अशी तजवीज योजतात. इंग्लंडमध्ये बहुतेक मोठे व्यवहार बँक ऑफ इंग्लंडच्या नोटा व चेक यांच्या आधाराने करतात. जर्मनीमध्येही नोटा जास्त लोकप्रिय करण्याची गेली दहा-वीस वर्षे खटपट चालू आहे व ती सर्वांशी यशस्वी झालेली आहे.

 वरील अर्थशास्त्रज्ञांचा युक्तिवाद हिंदुस्थानांतील तज्ञ लोकांस सम्मत आहे; परंतु त्यांचे ऋणणे असे आहे की, चलनामध्ये सोन्याचे नाणे विशेष प्रमाणावर नसले तरी, मुख्य चलन सोन्याचे पाहिजे व खुली टांकसाळ पाहिजे. ह्मणजे हल्ली जो पौंडांत नुसता हिशोव करितात व फक्त इंग्लंडमध्येच पौंड मिळण्याची व्यवस्था असते ती पद्धति काढून टाकून, पौंड हे हिंदुस्थानांजच वाटेल त्यास वाटेल तेव्हां मिळाले पाहिजेत. असे झाल्याशिवाय सोन्याचे चलन आहे असे ह्मणणे ह्मणजे निव्वळ शब्दच्छल करणे होय.

 सन १९०० मध्ये पौंड खरोखरीच्या चलनात आणण्याचा सरकारने प्रयत्न केला. नोटा दिल्या असतां, रुपयांऐवजी पौंड