पान:रुपया.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




(२८)

देण्याविषयी सर्व ‘करन्सी ऑफिसां' ना हुकूम दिला. कांहीं दिवसांनी जिल्ह्यांतील टेझरीऑफिसांनाही असे करण्याविषयीं परवानगी दिली. पोष्टांत मनीऑर्डरीचे पैसे देतांना पौंड देऊ लागले. प्रेसिडेन्सी बँकांनाही अशाच तऱ्हेच्या पद्धतीने पौंड लेकप्रिय करण्याविषयी सूचना दिल्या. १९०१ च्या मार्चमध्ये ६७.1/2 लक्ष पौंड लोकांच्या हातांत खेळत होते. यांपैकीं कांहीं पाई बाहेर देशांत निर्यात झाले व कांहीं लोकांनी ते पुनः सरकारकडे नेऊन त्यांचे रुपये मागितले. या दुसऱ्या कारणामुळे सरकारने धोरण बरेचसे बदलले. त्यावेळेपासून हल्लींपर्यंत सरकारचे धोरण" पुढील प्रकारचे आहे. पौंड हे कायदेशीर फेडीचे चलन आहे. पौंड दिल्यास, रुपये देण्याबद्दल सरकारने जाहिरनामा काढून हमी घेतली आहे. रुपये दिल्यास, पौंड देणे हे मात्र सरकारच्या इच्छेवर अवलंबून आहे. शक्य तितकें व सोईप्रमाणे सोन्याचे नाणें सरकार देते; पण कायद्याने सरकार बांधलेले नाही.

 १९०० मध्यें सोने चलनांत आणण्याचा प्रयत्न यशस्वी झाला नाहीं. याचे कारण कित्येकांच्या मते लोकांची पुष्कळ दिवसांची रुपये वापरण्याची सवय हे होय. हल्लीच्या काळीं सोन्याचे नाणे केल्यास ते कितपत लोकप्रिय होईल हे पाहू. गेल्या दहा पंधरा वर्षात पौंडांचे चलन कसे झाले आहे ते प्रथम दिले पाहिजे.