पान:रुपया.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




प्रकरण ३ रे
हिंदुस्थानांतील चलनापैकी धातूचे चलन -सोने व रुपे.

फौलर कमिटीच्या सूचनांस अनुसरून १८९९ मध्ये सॉव्हरिन हे नाणे कायदेशीर फेडीचे चलन केले व इंग्लंडांतून सॉव्हरिन येण्यास सुरवात झाली. १९०३ पासून १९१० पर्यंत सॉव्हरिन चलनांत आणण्याबद्दल विशेष जोराचे प्रयत्न कोणाह। केल नाहींत. १९१० सालीं सर जेम्स मेस्टन यांनी सोन्याच नाणे चलनांत आणण्याचा आमचा पूर्ण निश्चय आहे असे जाहीर केले. १९१२ मध्ये हिंदुस्थानाकरितां निराळे दहा रुपया सोन्याचे नाणे करावे असे स्टेट सेक्रेटरी यांनी ठरविलें ; पर त्यासंबंधाने हिंदुस्थान सरकारने कांहींच केले नाही.

 यूरोपांतील देशांची प्रवृत्ति अलीकडे अशी आहे की, खरोखरी चलनांत सोने विशेष न ठेवतां, नोटांवर जास्त व्यवहार कर याचा वे सर्व सोनें एका बँकेत शिलकीमध्ये ठेवावयाचें. जर्मनी व ऑस्ट्रिया-हंगेरी वगैरे देशांत याप्रमाणेच करितात. किंबहुना हल्लीं इजिप्टशिवाय कोणत्याही देशांत खरोखरीचे चलन, सान्याचे नाणें नाहीं. चलनांत सोने ठेविल्यास, आंतरराष्ट्रीय देण्याकरितां जेव्हां त्याची गरज पडते, त्यावेळेस ते हातास लागत नाहीं. तेव्हा शक्य तेवढे सोन्याचे नाणे एका केंद्रस्थानी ठेवणे