पान:रुपया.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




( २४ )

भिन्न झाली म्हणजे अकटोविकट श्रम करून तिला पूर्वपदावर खेचावी लागते. हे काम करण्याकरितां येथे रुप्याचा निधि व केंद्रस्थानी सोन्याचा निधि ठेवावा लागतो. रुप्याचे नाणे कमी पडल्यास नवीन नाणे पाडावे लागते ; व हा उपाय पांचचार व चालू राहिल्यास नाण्याची रेलचेल होऊन जाते. सोन्याचा निचे कमी पडल्यास तो सारखा वाढवावा लागतो व त्यालाही मयाब रहात नाही. हा निधि वाढविण्याकरिता, सारखा निर्यात माल पाठवावा लागतो व त्याबद्दलची जमा निधीत गेल्यामुळे मुख्य देशात तपासून कांहींच फायदा होत नाहीं.

 नैसगिक कारणांनी हंडणावळ बदलल्यास त्या पद्धतीचा कशी त्रेधा होते, याचे उत्तम दिग्दर्शन गेल्या साली झाले. रुपे महाग झाल्यामुळे १ रु.=२६ पेन्स अशी हुंडणावळ झाला. ही हुंडणावळ सरकारला इष्ट अशा स्थानी आणण्याकरितां, ५० कोटी पेक्षा अधिक रुपये किंमतीचे सोने इंग्लंडांत दिले गेले तरीही हुंडणावळ, स्थिर झाली नाहीं ती नाहीच. हिंदुस्थानास भी ३०।३५ कोटींस मुकावे लागले. त्याचप्रमाणे १९०८ साल जवळ जवळ ४० कोटींचा निधि खलास झाला. त्यावेळेस मुस्किलीने हुंडणावळ पूर्वस्थळावर आली. अशा रीतीचा या पद्धत मुख्य दोष आहे.

 या पद्धतीविषयी तज्ज्ञ लोकांत मतभेद असल्यामुळे, ह्या प्रश्नांची पूर्ण शहानिशा करणे जरूर आहे. या कारणाकरिता रॉयल