पान:रुपया.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




(२३)

मुळे, चलनाच्या आकारावर सरकारची सारखी नजर नसल्यास, चलन जास्त जास्त वाढून त्याची क्रयशक्ति कमी होऊन देशांत महागाई होऊ लागते. यामुळे दुसऱ्या अनेक आपत्ति उत्पन्न होतात. सुवर्णसंलग्नचलन में संक्रमणावस्थेचे द्योतक असून, सोन्याचे चलन एकदम करणे कठीण असते, ह्मणून कांहीं दिवस हे चलन करणे इष्ट आहे. परंतु हे संक्रमणावस्थेचे चलन हिंदुस्थानांत आत्यंतिक होऊन बसले आहे.

 हे चलन चांगले आहे अशी सरकारची खात्री झाली आहे, त्यामुळे नुकत्याच नेमलेल्या स्मिथ करन्सी कमिटीला' ह्या चलनाविषयीं साधकबाधक प्रमाणं जमा करण्याचा अधिकार न देतां, फक्त रूपये महाग झाल्यामुळे उत्पन्न झालेल्या अडचणीस उपाय सुचविण्याचेच काम तिच्याकडे सोपविले होते. वस्तुतः हिंदुस्थानांत सोन्याचे चलन स्थापणे इष्ट आहे, असे सर्व हिंदुस्थानांतील अर्थशास्त्रज्ञांचे मत असल्यामुळे, ह्या प्रश्नाचा पुनः मुळापासून विचार करणे अवश्य आहे. परंतु तसे न करतां, तात्पुरत्या युक्त्यांचा प्रयोग करून, हे चलन कायम ठेवण्याचा सरकारी अधिकाऱ्यांचा विचार आहे असे स्पष्ट दिसत आहे. यामुळे ही कृत्रिम पद्धति अतिशय घोंटाळ्याची होत चालली असून, नैसर्गिक व उत्तम मानलेल्या अशा चलन पद्धतीचे एकही अंग इच्यामध्ये उत्क्रांत होत नाहीं.

 हुंडणावळ स्थिर ठेवणे हे या पद्धतीचे हृद्गत असल्यामुळे, कोणत्याही नैसर्गिक कारणांनी हुंडणावळ कायदेशीर प्रमाणाहून