पान:रुपया.pdf/260

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१५)



कान्यांनी दुसन्या व्यापारधंद्यांत पडता कामा नये किंवा सरकारी प्रॉमिसरी नोटा इत्यादि विकण्यांत दलालाचे काम करतां कामा नये.
 प्रत्येक वर्षाच्या जून महिन्याचे व डिसेंबर महिन्याचे अखेरीस - मध्यवर्तिमंडळाने सर्व हिशोब पुरा करून तोंडमिळवणी केली - पाहिजे आणि अशा हिशोबाची व शिलकेची एक प्रत गव्हर्नर- जनरल इन्- कौन्सिल यांजकडे पाठविली पाहिजे. वाटेल ती माहिती मागविण्याचा, वाटेल तो कागद हजर करण्यास सांग - ण्याचा व सर्व हिशोब ठराविक पद्धतीनं प्रसिद्ध करण्यास लाव- याचा हिंदुस्थान सरकारास पूर्ण अधिकार आहे. दर सहा महिन्यांच्या नफ्यावरून डिव्हिडंड ठरविले जाईल. दरवर्षी योग्य ती रक्कम रिझर्व्ह ह्मणून ठेवण्याचा मध्यवर्तिमंडळास अधिकार आहे.
 सामान्यसभेच्या वेळी तीन हिशोबतपासनीस निवडावे. हे भाग धारण करणारे असले तरी चालतील परंतु गव्हर्नर, स्थानिक मंडळाचे सभासद व दुसरे अधिकारी यांना निवडूं नये. दुसरी सामान्य सभा भरेपर्यंत पूर्वीचे हिशोबतपासनीस यांनी काम करावें. गव्हरनर जनरल यांनी याशिवाय त्यांना वाटतील ते हिशोबतपासनीस नेमण्याचा अधिकार आहे. हिशोतपावनीस यांना ते मागतील तेव्हां बँकेची पुस्तकें व बह्या दाखविल्या पाहिजेत. त्यांनी आपल्या मदतीस दुसरे अकौंटंट नेमावे.