पान:रुपया.pdf/261

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१६)



 " सर्व माहिती ठराविक पद्धतीने दिलेली आहे, बँकेची स्थिति यथार्थ दिलेली आहे व काही माहिती मध्यवर्तिमंडळाकडून मागि- तलेली असल्यास ती समाधानकारक आहे " अशाबद्दल हिशोब- तपासनीस यांनीं भाग धारण करणारांस अहवाल सादर करावा. सरकारी तपासनीस यांनीं आपला अहवाल हिंदुस्थानसरकार यांस सादर करावा.
 कोणत्याही भाग धारण करणारांस, बँकेस सूचनापत्र पाठवता येते. रजिष्टरांत असलेल्या पत्त्यावर व्यवस्थित रीतीनें पोष्टांतून हॅ पत्र पाठविलें झगजे बँकेची जबाबदारी संपली. हें पत्र पोंचले नसल्यास तसे सिद्ध करण्याची जबाबदारी भाग धारण करणारावर आहे. पत्ता नसल्यास सरकारी गॅझेटांत व एका दैनिक पत्रांत हैं सूचना- पत्र जाहीर केलें झणजे ज्या दिवशीं तें जाहीर होईल त्यादिवशी त्याला ते मिळाले असे समजावें. बँकेस सूचनापत्र पाठविणं असल्यास ते स्वतः मुख्य ऑफिसांत हजर करावे किंवा पोष्टाने पाठवावे.
 या कायद्यानें १८७६ चा प्रेसि० बँकाचा अॅक्ट १८७९ चा प्रेसि० बँकांचा अॅक्ट, १८९९ चा प्रेसि० बँकांचा अॅक्ट ; १९०७ प्रेसि० बँकांचा अमेंडमेंट अॅक्ट व १९९६ चा प्रेसि० बँकांचा अमेंडमेंट अॅक्ट असे पूर्वीचे सर्व कायदे रद्द झाले आहेत.