पान:रुपया.pdf/259

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१४)



 गव्हर्नर किंवा सभासद यांच्या जागा रिकाम्या आहेत एवढ्याच कारणानें मध्यवर्तिमंडळाचा किंवा स्थानिक मंडळाचा कोणताही ठराव रद्द होऊ शकत नाहीं. दुसऱ्या गव्हर्नराच्या किंवा अधि- काराच्या किंवा मंडळाच्या सभासदाच्या दोषांबद्दल गव्हर्नर किंवा मंडळाचा सभासद यास त्यांचा स्वतःचा दोष असल्याशिवाय, जबाबदार धरू नये.
 बँकेचा शिक्षा कमीत कमी तीन गव्हर्नरांच्या देखत मारला पाहिजे. याशिवाय स्थानिक मुख्य शाखांकरितां दुसरे शिक्के केले जातील. हे शिके, स्थानिक मंडळाच्या कमीत कमी दोन सभा- सदांच्या देखत मारले पाहिजेत. याशिवाय त्यावेळी स्थानिक मंडळाचा सेक्रेटरी हजर पाहिजे. ज्या कागदावर शिक्का मारला असेल, त्यावर या सर्वांनी आपली सही केली पाहिजे. अशा शिक्याशिवाय कोणताही कागद कायदेशीर समजला जाणार नाहीं.
 मध्यवर्तिमंडळास व स्थानिक मंडळास इतर अधिकारी, नोकर- चाकर वगैरे नेमण्याचा व त्यांचे पगार, पेनशन वगैरे ठरविण्याचा पूर्ण अधिकार आहे. कोणत्याही अधिकान्यास अथवा नोकरास काढून टाकण्याचा त्यास अधिकार आहे. मध्यवर्तिमंडळानें सरकारी गॅझेटांत जाहीर करून, ज्या अधिकान्यांस आपल्या बतीनें नियुक्त केलें असेल, त्यांनी, स्टॉक, डिबेंचर, खाती, हुंड्या, लेटर्स ऑफ क्रेडिट इत्यादिकांवर सह्या कराव्या. कोणत्याही अधि-