पान:रुपया.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




( २२ )

पिसोचा संबंध सोन्याशी जडला गेला व त्यास स्थिरता आली. त्यानंतर मेक्सिको, सयाम, स्टेटस सेटलमेंट्स या ठिकाणीही सुवर्णसंलग्नपद्धति प्रचलित केली व त्यामुळे, या सर्व देशांचा फायदा झाला आहे असे प्रो० कीन्स यांचे म्हणणे आहे. या लहानशा पुस्तकांत स्थलाभावामुळे या वादांत शिरणे शक्य नाही. येथे एवं ढेच सांगितले पाहिजे की, ही पद्धति हिंदुस्थानेदशास फायद्याचा नाहीं व जरी असली तरी हल्ली ज्या तत्त्वांवर तिची अंमलबजावणी चालली आहे, ती तत्त्वे तरी हिंदुस्थानच्या हितास घातक अशी आहेत. याविषयी विशेष विवेचन, शेवटच्या प्रकरणांत करणार आहो.

 सुवर्णसंलग्नचलनांत, देशांतील नाण्याची स्थिति कृत्रिम हात हा मोठा दोष आहे. इंग्लंड इत्यादि देशांत, सोने हे वाटेल तेव्हा टांकसाळींत नेऊन नाणे पाडून घेता येते. त्यामुळे सॉव्हरिन त्यांतील सोने यांच्या किंमतींत तफावत रहात नाही. जा नाणी झाल्यास त्यांची किंमत कमी होऊन नाणी अटविली जाता कमी नाणी असल्यास सोने देऊन नाणे नवीन पाडतात. सुवर्ण संलग्नचलनांत असे होत नाही. नाण्याची किंमत धातु किंमतीपेक्षा जास्त असल्यामुळे ते अटविण्यांत नुकसान होते; या * Keyne's Indian Currency and Finance Chapter ll या पद्धतीचे विस्तृत वर्णन Kenneley-Model:11 (urren८) Reforms या पुस्तकांत केलेले आहे..