पान:रुपया.pdf/258

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १३ )


 स्थानिक मुख्य शाखेच्या भांडवलापैकी निम्या किंमतीच्या भागांचे धारण करणारे, बहुमताने ठराव पास करून, स्थानिक मंडळाच्या सभासदास काढून टाकू शकतात व त्याच्या जागी दुसरा नेमूं शकतात.
 मध्यवर्तिमंडळाची बैठक तीन महिन्यांतून एकदा तरी झालीच पाहिजे. प्रत्येक स्थानिक मुख्य शाखेच्या ठिकाणीं एक वेळां तरी हे मंडळ एकत्र झालें पाहिजे. कोणत्याही स्थानिक मंडळास मध्यवर्तिमंडळाची सभा भरविण्याविषयीं मॅनेजिंग डायरेक्टर यांस सांगण्याचा अधिकार आहे. अशा प्रत्येक समेंत जे गव्हरनर असतील त्यांनीं आपणांपैकीं एकास अध्यक्ष निवडावे. अशा अध्यक्षास आपले स्वतःचे मत अजून शिवाय सारखी मतें झाल्यास जादा निर्णायक मत देतां येते.

 स्थानिक भाग धारण करणारांची सामान्य सभा स्थानिक मंडळां- .तील सभासदांची संख्या ठरवूं शकेल. स्थानिक मंडळाची सभा ही मंडळाच्या अध्यक्षाने तो नसल्यास उपाध्यक्षाने व तोही नस- ल्यास सर्वांत प्राचीन अशा सभासदाने बोलवावी. हे अध्यक्ष व उपाध्यक्ष पहिल्या सभेच्यावेळी स्थानिक मंडळाने निवडावे. एका- मागून एक दोन वेळा एकच मनुष्य या जागांवर निवडूं नये. मुखादी जागा विमी झाल्यास इतर सभासदांनी ती भरून काढावी.