पान:रुपया.pdf/257

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १२ )



 जेथे स्थानिक मुख्य शाखा असतील, तेथेंही वर्षांतून एकदा. मध्यवर्तिनंडळ ठरवील त्या तारखेस त्या शाखेच्या पत्रकांतील यादीप्रमाणे सामान्य सभा झाली पाहिजे. या सभेतील काम मध्य- वर्तीसभेप्रमाणेच चाळतील. मुद्दाम सभा बोलाविण्यास, दहा भाग धारण करणारांस अधिकार आहे व त्यांच्या भागांची रक्कम ५० हजार रुपयांची असली पाहिजे.
 गव्हनर किंवा स्थानिक मंडळाचा सभासद होण्यास १० हजा- रांचे भाग धारण करणे आवश्यक आहे; पण सरकारने नेमलेला अधिकारी असेल तर, त्याला ही अट लागू नाहीं. एखाद्या दुसन्या बँकेचा डायरेक्टर, एजंट अथवा मॅनेजर यांस इंपीरियल बँकेत गर्न अथवा स्थानिक मंडळाचा सभासद होता येणार नाहीं; परंतु अशा मनुष्यास गव्हर्नर जनरल हे २८ व्या कलमांत दिलेल्या अधिकारान् त्या जागी नेमूं शकतील. इंपीरियल बँकेत जर नोकरी धरली, तर वरील अधिकार देतां येणार नाहीत. सहा महिन्यांवर गैरहजर राहिल्यास त्यांचे हे अधिकार काढून घेतले जातील. एका संस्थेतील दोन डायरेक्टर अथवा भागीदार एकाच वेळी मध्यवर्तिमंडळाचे किंवा स्थानिक मंडळाचे सभासद होऊं शकणार नाहीत.
 एकंदर भांडवलाच्या निम्या किंमतीचे भाग धारण करणारे बहुमताने गव्हर्नरास काढून टाकू शकतील; परंतु गव्हर्नर जनरल यांनीं नेमिलेल्या गव्हर्नरास मात्र काढता येणार नाहीं.