पान:रुपया.pdf/256

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ११ )



 एकतृतीयांश भाग धारण करणारांच्या मताने ठराव पास झाल्यास, बँकचें भांडवल वाढवितां येईल अथवा कमी करतां येईल. असे करण्यास गव्हर्नर जनरल यांची संमति पाहिजे. असा ठराव झाल्यानंतर मध्यवर्ति मंडळाने योग्य ती व्यवस्था करावी. प्रत्येक वर्षी ऑगष्ट महिन्याच्या १ तारखेस सामान्य सभा भरविली जाईल. या सभेबद्दल पंधरा दिवस पूर्वी सरकारी गॅझेटांत सूचना दिली जाईल.
 पांच लक्षांचे भाग धारण करणारे १०० लोक किंवा कोण- तेही ३ गव्हर्नर [ बँकेचे ] यांना मुद्दाम सभा बोलाविण्याचा शक्ति आहे. अशा सभेबद्दल दोन महिनेपूर्वी सूचना दिली पाहिजे व त्या सूचनेत सभेच्या उद्देशाबद्दल विवरण केले असले पाहिजे. २०० भाग धारण करणारे हे कोणतीही सभा चालविण्यास अत्या- वश्यक आहेत. भाग धारण करणारास आपल्या वतीने प्रतिनिधि पाठवितां येईल. प्रत्येक गोष्ट बहुमताने ठरविली जाईल. सभेच्या पूर्वी तीन महिने भाग धारण केल्याशिवाय सभेत मत देण्याचा हक्क मिळणार नाहीं. ज्या भागाचे कांहीं पैसे अद्यापि भरलेले नाहीत, त्यासंबंधानें मत देण्याचा हक्क पैदा होणार नाहीं. सभासदांनी सांगि- तल्यास, अध्यक्षांच्या इच्छेप्रमाणे उघड रीतीनें अथवा गुप्त रीतीने (बॅलटच्या पद्धतीने) मतांची मोजदाद (पोल) केली जाईल समेत कलेले सर्व ठराव बँकेस निर्बंध करणारे होतील असें समजावें.