पान:रुपया.pdf/255

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १० )



 ( ४ ) सहा महिन्यांपेक्षां जास्त मुदतीनंतर ज्यांचे पैसे वसूल होतील, अशा हुंब्बा अथवा इतर निगोशिएबल बेचनपत्रे इत्या- दिकांबद्दल रोख पैसे देणें अथवा त्यांचे आधारावर कर्ज वगैरे देणे.

शेड्युल नं० २.
इंपीरियल बँकेचे सामान्य नियम.
(फक्त महत्वाचे तेवढेच दिले आहेत. )

 प्रत्येक भागाबद्दल शिक्का मारलेलें सर्टिफिकेट मिळाले पाहिजे. अनेक इसमांच्या नांवाचा भाग असल्यास, त्यांपैकी कोणा तरी एकास सर्टिफिकेट दिले जाईल, भाग धारण करणाऱ्याने बँकेस जें देणें असेल, त्याबद्दल बँकेच्या भागावर व डिव्हिडंडवर त्याचा हक्क राहील. भागाविषयीं मांगणी करणे झाल्यास, ती एकाच काळी भागाच्या एकचतुर्थांशपेक्षां जास्त असू नये व दोन मागण्यांमध्ये दोन महिन्यांचे अंतर असावें. भागाचे पैसे न दिल्यास, त्याबद्दल व्याज द्यावे लागेल. भाग विकल्यास, विकणारा व विकत घेणारा या दोषांची अर्जावर सही पाहिजे व बँकेच्या पुस्तकांत नवीन भाग धारण करणाराचें नांव नोंदले जाईपर्यंत पूर्वीच्या मनुष्याची मालकी राहील. भाग धारण करणारा मृत झाल्यास, त्याचे एक्झिक्यूटर्स हेच मालक समजले जातील. एखादी मागणी करून पैसे न आल्यास भाग धारण करणारास नोटीस दिली पाहिजे. अशा नोटि- शीबद्दल फांहीं तजवीज न झाल्यास भाग काढून घेतला जाईले.