पान:रुपया.pdf/254

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(९)



 ( ख ). बँकेच्या कामाकरितां हिंदुस्थानांत कर्जानें पैसे काढणे व याकरितां बँकेजवळ असलेला कोणताही तिच्या माल- कीचा माल गहाण लावून देणे.
 ( ग ). इंग्लंडांत कर्ज काढणे. हे कर्ज फक्त स्वतःच्या जवळ असणान्या व खात्रीनें येणें असलेल्या मालमत्तेच्या आधा- रावरच काढले पाहिजे. अन्य रीतीनें नाहीं.
 (घ) आतांपर्यंत निर्दिष्ट केलेल्या मुख्य व्यवहारांच्या अंतर्गत जे दुसरे बारीकसारीक व्यवहार अथवा कामे करावी लागतील, ती करणे.
 या बँकेने पुढील व्यवहार कधीही करू नयेत.

 ( १ ) सहा महिन्यांपेक्षा जास्त मुदतीकरितां कर्ज देणे. स्वतःच्या भागांच्या आधारावर कर्ज देणे.
 ( २ ) एका व्यक्तीकरितां अथवा भागीदारीने चालविलेल्या व्यापारी संस्थेकरितां एका ठराविक रकमेपेक्षा जास्त रकमेच्या हुंड्यांचे रोख पैसे देणे व एका ठराविक रकमेपेक्षा जास्त कर्ज देणे.
 ( ही रक्कम पुढं सरकारी गॅझेटांत जाहीर केली जाईल. )
 ( ३ ज्या ठिकाणी हुंडी ( अथवा दुसरे कायदेशीर 'निगो- शिएबल' बेचनपत्र ) रोख पैसे मागण्याकरितां दाखविली जाईल अशा हुंडीचे पैसे ( अथवा तिच्या आधारावर कर्ज देणे अथवा खाते उघडणें ) तिच्यावर भिन्न भिन्न अशा दोन व्यापायांच्या अथवा व्यापारी संस्थांच्या सह्यांशिवाय देणे.