पान:रुपया.pdf/253

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(८)


 (ओ). लोकांकडून आपल्या येण्यामध्ये ज्या ज्या वस्तु स्थावर व जंगम हातांत येतील, त्या विकून, त्यांची रक्कम तयार करणें.
 ( औ). कमिशन घेऊन पैशाच्या देवघेवीसंबंधी अनेक व्यवहार करणं.
 ( अं ). एखाद्या कंपनीचे भाग विकणे किंवा ताब्यांत घेणे, सिक्यूरिटी अथवा भाग यांचे पैसे व व्याज वसूल करणे आणि हे वसूल केलेले पैसे हुंड्या करून किंवा अन्य मार्गांनी मालकास पाठविणें ; या वरील कामासंधाने कमिशन घेऊन, एजंट या नात्याने काम करणे व ताब्यांतील जमीनजुमला, घरें इत्यादि विकून टाकून निकाल करण्याच्या कामांत व्यवस्थापक अथवा ट्रस्टी होणें .
 (अ:). [अं] यांत निर्दिष्ट केलेल्या व्यवहाराकरितां हुंड्या काढणं अथवा लेटर्स ऑफ क्रेडिट देणें तीं अशीं कीं ज्यांचे पैसे हिंदुस्थानाच्या बाहेर मालकांस मिळतील. हीच कामे आपल्या गिन्हाइकांकरितां जरूर लागल्यास करणं.
 ( क ). अशा तन्हेच्या हुंड्यांचे पैसे देण्याकरितां हिंदु- स्थानाबाहेर ज्यांचें पैसे मिळतील अशा तन्हेच्या हुंड्या (लंडन, पॅरिस वगैरे ठिकाणीं पौंडांत अथवा फ्रँकमध्ये वसूल होणान्या ) खरेदी करणे ; मात्र या हुंड्या सहा महिन्यांच्या मुदतीपेक्ष जास्त मुदतीच्या असू नये