पान:रुपया.pdf/252

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(७)


असलेल्या किंवा ज्यांवर बँकेचा हक्क आहे अशा मालाची तो माल अटीप्रमाणे सोडवून नेला नसल्यास विक्री करणें व ते पैसे वसूल करून घेणे.
 (इ). हुंड्या देणे, हुंड्यांचा स्वीकार करणे व कटमिति कापून घेऊन हुंड्यांबद्दल रक्कम देणे. हिंदुस्थानाबाहेरच्या हुंड्या गव्हनर जनरल यांच्या संमतीनें विकण व विकत घेणे,
 (ई). बँकेचे पैसे ( अ ) मध्ये निर्दिष्ट केलेल्या सिक्यूरि- टींत गुंतविणे व त्यांची रोख रक्कम करण सिक्यूरिटीमध्यें बात- लेल्या पैशांची दुसऱ्या तऱ्हेच्या कर्जामध्यें अथवा ठेवीमध्यें अद- लाबदल अथवा रूपांतर करणे.
 ( उ ). " पोस्टविले' व लेटर्स ऑफ क्रेडिट काढणे व ती गिऱ्हाइकांमध्यें प्रचलित करणे; मात्र हीं दाखविणारास दर्शनी दिली पाहिजेत अशा स्वरूपाची नसावी.
 ( ऊ ). सोनें अथवा रूपें विकर्णे किंवा विकत घेणें. सो- न्याची अथवा रुप्याची नाणीं विकर्णे अथवा विकत घेणे.
 (ए). ठेवी ठेवणे व चालू खातें ठेवणें व कर्ज देण्याऐवजी एखाद्याच्या नांवें रक्कम जमा मांडणे.
 (ऐ). दागिने, सोन्यारुप्याची भांडी, ताटें, जवाहिर, मोत्यांचे दागिने, मिळकतीचा हक्क शाबीद करणारे कागदपत्र व इतर मूल्यवान वस्तूंची ठेव घेणें अथवा त्यांची सुरक्षितता आ- पल्या शिरावर घेणे.