पान:रुपया.pdf/251

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
शेडयूल नं० १.
बँकेच्या व्यवहारांचं स्पष्टीकरण.

 या बँकेस पुढीलप्रमाणे व्यवहार करण्याची परवानगी आहे.
 ( अ ). पैसे कर्जाऊ देणे.
 स्टॉक, ज्या सिक्युरिटीमध्ये पैसे ठेवण्यास पार्लमेंटच्या अॅक्ट- प्रमाणं अथवा हिंदुस्थानांतील कायद्याप्रमाणे ट्रस्टींना परवानगी आहे. अशा सिक्यूरिटी, स्थानिक सरकारें यांच्या सिक्यूरिटी, सिलोनच्य सरकारी सिक्यूरिटी प्रेसिडेन्सी बँक अॅक्ट १८७६ या अन्वया नमूद केलेल्या सरकारी रेलवेच्या सिक्यूरिटी ; कोणत्याही कायदे- कौन्सिलमध्ये पास झालेल्या कायद्यास अनुसरून काढलेले कर्ज- रोखे किंवा डिबेंचर अथवा जिल्हा बोडींचे कर्जरोखे ; गहाण ठेव- लेला व बँकेच्या ताब्यांत दिलेला माल, स्वीकारलेल्या हुंड्या : लिहून दिलेलीं खातीं; कंपन्यांचे पूर्ण रक्कम भरलेले भाग; स्थावर- मिळकत व तिचा हक्क शाविद करणारे कागदपत्र यांच्या आधारां- वर एखाद्याच्या नांवें रक्कम जमा करून त्याचे खाते उघडणे, भारतमंत्री यांच्या नांवें खाते उघडल्यास सिक्यूरिटी न ठेवतां त्यांना क्रेडिट देण्यास अथवा ठराविक रक्कम उचलण्याची परवा- नगी देण्यात मध्यवर्ति मंडळास अधिकार आहे.
 ( आ ). अशा तन्हेनें ठेवलेल्या सिक्यूरिटी वगैरे विकणे व त्या विकून आलेल्या पैशांची व्यवस्था करणे; बँकेच्या ताब्यांत