पान:रुपया.pdf/250

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५)

करारही बँकेस करतां येतील अशा तऱ्हेचे सर्व करार बँक व जिच्याशी करार केला ती व्यक्ति अथवा संस्था या दोहोंना बांधूं शकतात.
 कलम २२. शेडयूल नंबर २ यांमधील सर्व नियम या बँकचे नियम समजले जातील.
 कलम २४. बँकेची एकंदर व्यवस्था 'गव्हरनर यांचें मध्य- वर्ती मंडळ' करील. बँकेच्या सर्व हक्कांचें हें मंडळ प्रतिनिधि ह्मणून समजावें.
 कलम २५. मुंबई, मद्रास व कलकत्ता येथें 'स्थानिक मंडळे' स्थापन केली पाहिजेत. यांशिवाय इतर ठिकाणीं मध्यवर्ति मंडळ, गव्हरनर-जनरल यांच्या संमतीने स्थानिक मंडळे अस्तित्वांत आणूं शकतें.
 कलम २७. पूर्वीच्या प्रेसि. बँकांचे डायरेक्टर प्रेसिडेंट, व्हाइस् प्रेसिडेंट, व सेक्रेटरी यांचे 'स्थानिक मंडळ' प्रथम केले जाईल.
 कलम ३१. गव्हरनर जनरल यांच्या संमतीने मध्यवर्ति मंडळ हे पोटकायदे करूं शकतें.
 कलम ३२. इतर कायद्यांत जेथें जेथें प्रेसि. बँकांचा उल्लेख केलेला आहे, तेथें तेथें त्यांच्या ऐवजी इंपीरियल बँक हिचा उल्लेख केला आहे असे समजावें.