पान:रुपया.pdf/249

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ४ )

कलम १३. गव्हरनर-जनरल इन्- कौन्सिल यांच्या परवानगीनें दुसऱ्या बँका आपल्यात सामील करण्याचा, त्यांचें भांडवल व भांग आपण घेण्याचा व स्वतःचें भांडवल अशा कामाकरितां वाढविण्याचा हक्क तिला आहे अशा तऱ्हेनें नवीन अंगीकृत केलेल्या व्यवहारांची या कायद्याअन्वयें व्यवस्था ही बँक करील. अशा तऱ्हेच्या बँका चा १९१३ च्या कंपनीच्या अॅक्टाप्रमाणे नोंदविलेल्या असल्या पाहिजेत.
 कलम १४ या बँकेचे भाग हे जंगम मिळकत समजली जाईल. या भागांना क्रमानें संख्या दिलेली असली पाहिजे.
 कलम १५. भागाचा हक्क मिळण्याकरितां भांगाचे सर्टिफि केट शिक्कामोर्तब केलेले असले पाहिजे.
 कलम २०. भागांचें नोंदणीपत्रक बँकेनें सरकारी गॅझेटांत प्रसिद्ध केलेल्या जागी ठेविलें पाहिजे व तें तपासण्याचा वाटेल त्या भागीदारास हक आहे. अशा नोंदणीपत्रकाची प्रत वाटेल त्या भागीदारास मागता येईल.
 कलम २१. दोन व्यक्तींमध्यें जो करार लेखी होऊ शकेल असा करार ही बँक कुरूं शकेल व त्यावर तिने अधिकृत केलेल्या मनुष्याची सही असली ह्मणजे पुरे आहे. त्याचप्रमाणे तोंडी