पान:रुपया.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




( २१ )

आहे. खुद्द रशियांत सोने फार नसून जवळ जवळ अडीच कोटि

पौडाच्या किंमतीच्या हुंड्या (इंग्लंड, जर्मनी, इत्यादि देशांत पटणाच्या) रिशयन बँक आपल्याजवळ ठेवते, व त्यांचा उपयोग आंतरराष्ट्रीय देण्याघेण्याकरितां करते. नॉर्वे, डेन्मार्क येथेही अशीच पद्धति आहे. परंतु देशांत जरी सोने विशेष नसले, तरी टांकसाळ खुली असल्यामुळे, या सर्व देशांतील नाण्यांना हिंदुस्थानप्रमाणे किंमत दिलेली नाही. त्याची किंमत त्यांतील सोन्यावर अवलंबून असते. त्यामुळे, हिंदुस्थानच्या पद्धतींत व या पद्धतींत पूर्ण साम्य आहे असें म्हणता येणार नाहीं.

 प्रो० कीन्स यांचे असे म्हणणे आहे की, या सर्व देशांतील पद्धति व हिंदुस्थान देशांतील पद्धति यांमध्ये फरक एवढाच आहे की, त्या देशांनी जे अर्धवट केलेले आहे तेच हिंदुस्थानने पूर्णपणे व कायद्याच्या आधाराने केलेले आहे. परंतु हे म्हणणे चुकीचे आहे. कारण, वरील देशांत मुख्य चलन सोन्याचे असल्यामुळे जरी सोन्याचे नाणे व्यवहारांत नसले, तरी टांकसाळ खुली असल्यामुळे, चलनास कृत्रिमता आलेली नसते.

 १९०३ मध्ये फिलिपाईन बेटांत अशाच तऱ्हेची चलनपद्धति युनायटेड स्टेट्सने सुरू केली. चलनांत पिसो हे नाणे असून, त्याचा व डॉलरचा भाव नेहमींचा ठरवून जरूर त्या वेळेस अमेरिकेंत डॉलर मिळतील अशी हुंडणावळीची रचना केली. त्यामुळे