पान:रुपया.pdf/248

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३ )

चालू खातें व ठेव ठेवणे हे व्यवहार करूं शकेल, इतरांशीं करूं शकणार नाही.
 कलप १०. भारतमंत्री यांच्याशी करार करून हिंदुस्थान- सरकारच्या वतीने रोख नार्णे, गट व सिक्युरिटी हीं जमा करणे इकडून तिकडे पाठविणें वगैरे व्यवहार ही बँक करूं शकेल. त्याच- प्रमाणे सरकार सांगेल त्याप्रमाणे इतर व्यवहारही करण्याचा तिला हक्क आहे. या करारांमध्ये गव्हरनर जनरल इन् कौन्सिल यांना बँकेस निर्बंध घालण्याचा अधिकार आहे व हे निर्बंध न पाळल्यास हा करार रद्द करण्याचाही अधिकार आहे. या कायद्याच्या सुर- वातीपासून पांच वर्षांच्या आंत नवीन शंभर शाखा (कमीत कमी) उघडणे है आवश्यक आहे. त्यापैकी २५ शाखा सरकार सांगेल त्याच ठिकाणी उघडल्या पाहिजेत.
 कलम ११. या कामाकरितां इमारती बांधण्याकरितां बगैरे स्थावर मिळकत विकत घेण्याचा या बँकेस अधिकार आहे त्याचप्रमाणे अशी मिळकत विकर्णे, भाड्याने देणं, तिचा विमा उतरर्णे इत्यादि व्यवहार करण्याचाही तिला अधिकार आहे.
 कलम १२. वाटेल तितक्या शाखा वाटेल तेथे उघडण्याचा तिला अधिकार आहे. यांपैकी वाटेल त्या शाखा बंद करण्याचाही तिला हक आहे.