पान:रुपया.pdf/247

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २ )

बँकेच्या अस्तित्वामुळे पूर्वीच्या बँकांचे दावे वगैरे यांना बाध येणार नाहीं. प्रेसि० बँकांनी केलेले सर्व करार, बचनें व इतर कागढ़ हे सर्व नवीन बँकेस बंधनकारक आहेत.
 कलम ५. पूर्वीचे भाग धारण करणारे नवीन बँकेचे तित- क्याच रकमेचे भाग धारण करणारे असे समजले जातील. पांचशे- पेक्षा लहान रकमेबद्दल अपूर्णांकदर्शक सर्टिफिकिटें देण्यांत येतील. ही सर्टिफिकिटें परत देऊन त्यांनी नवे पूर्ण रकमेचे भाग विकत घ्यावे किंवा त्याबद्दलचे पैसे परत घ्यावे. पूर्वीच्या प्रत्येक भागी- दारास आणखी दोन भाग मागण्याचा अधिकार आहे. तीन महिन्यांत हे नवीन भाग न मागितल्यास, ते सार्वजनिक रीतीने विकले जातील. हिंदुस्थान देशाच्या बाहेर राहणान्या भागो- दास सहा महिनेपर्यंत मुदत दिली जाईल.
 कलम ७. नवीन बँक सुरू झाल्याबरोबर प्रेसि० बँका नष्ट झाल्या असे समजावे. नंतर पूर्वीच्या बँकांवर दावे वगैरे चाल- णार नाहीत.
 कलम ८. ही शेडयूल नंबर १ मध्ये निर्दिष्ट केलेले सर्व व्यवहार करूं शकेल.
 कलम ९.लंडन येथील शाखा, पूर्वी प्रेसि० बँकाचे जे गिन्हाईक अथवा खातेदार तीन वर्षेपर्यंत असतील, त्यांच्याशीच