पान:रुपया.pdf/246

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिशिष्ट (अ). इंपीरियल बँकेची घटना. सन १९२० चा अॅक्ट ४७ यामधील मुख्य कलमें पुढे दिलेली आहेत. कलम ३. इंपीरियल बँक ऑफ इंडिया नांवाची बँक, हछींच्या प्रेसिडेन्सी बँकांचे व्यवहार आपल्या अंगावर घेण्याकरिता व या कायद्यान्वयें इतर व्यवहार चालविण्याकरितां स्थापिली जात आहे. हल्लीच्या प्रेसिडेन्सी बँकांचे भाग धारण करणारे सर्व लोक व पुढे माग धारण करणारे सर्व लोक मिळून, एक संस्था समजली जाईल व या संस्थेवर फिर्याद होऊ शकेल व है। संस्था दुस-यांवर फिर्याद करू शकेल. सुरुवातीचे भांडवल ११ कोटि २५ लक्षांचे आहे व प्रत्येक भाग ५०० रु० किंमतीचा आहे. भाग धार करणारांची जबाबदारी मर्यादित [ लिमिटेड] आहे, कुलम ४. प्रेसि० बँकांचे सर्व व्यवहार ही बँक करील. हे व्यवहार ह्मणजे त्यांचे हक्क शक्ति, अधिकार, विशिष्ट अधिकार, मालमत्ता [ रिझव्र्ह फंड, शिलकी कर्जाऊ दिलेल्या रकमा ] मारूमत्तेपासून उत्पन्न होणारे हक्क व हितसंबंध, हिशेजाची पुस्तकें, वह्या, दस्तऐवज, दाखले, कर्ज व देणे ही सर्व होत. ह्या नवीन