पान:रुपया.pdf/240

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २३७ )

जातील व शंभर अथवा त्यांहून अधिक अशा किंमतींच्या देण्या- करितां नवीन नोटांचा उपयोग केला जाईल. यावरून वरील आक्षेप अगदी भ्रामक आहे असे दिसून येईल. बँकिंगची पद्धति अधिक प्रचलित झाली ह्मणजे पौंडांचा व्यवहारांत उपयोग कभी कमी होऊन चेक व पौंडांच्या नोटा यांच्या आधारे बहुतेक व्यव हार चालतील. असे होण्यास इंपीरियल बँकची एक शाखा प्रत्येक जिल्ह्यांत उघडण्याची सरकारने व्यवस्था केली पाहिजे. सुवर्णचलन केलं ह्मणजे सोन्याचें नाणे मोठ्या प्रमाणांत वापरलेच पाहिजे असे नाहीं; यूरोपांतील देशांत सुवर्णचलन असूनही नाण्याची काटकसर नोटांच्याद्वारे होऊं शकते. मग हेंच कार्य हिंदुस्थानांत होणे अशक्य कां असावें?
 सुवर्णचलनाविरुद्ध एक आक्षेप असा आहे की, हिंदुस्थानांतील लोकांस त्याची जरूरी नाही. आतां लोकांना एखाद्या गोष्टीची जरूरी आहे की नाहीं हें टरविणे कठीण आहे. विशेषतः हिंदु- स्थानांतील लोक अशिक्षित व आपले मत दर्शविण्यास असमर्थ असल्यामुळे त्यांचे मत काय हे ठरविण्यापेक्षा त्यांना हितकर कोणती पद्धति आहे हैं ठरविणे जास्त सयुक्तिक आहे.मराठी साम्राज्यांत व मोंगलांच्या साम्राज्यांत हल्लापेक्षां व्यापार कमी असूनही अनेक शतकें सोन्याचे नाणे प्रचलित होते असें व्या. रानडे यांनी दाखविले आहे. फौलर कमिटीनेही हिंदुस्थानांत सोन्याचे नाणे सुरू करणे इष्ट आहे असे आपले मत दिले-