पान:रुपया.pdf/239

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २३६ )

ची टंचाई पडून पुन्हां अटविलेलें सोनें टांकसाळीत नेऊन त्याचं नाणें पाडावे लागेल. हल्लींच्या काळी पौंड अटवितात याचे कारण असे आहे की, रुपया है कायदेशीर चलन असल्यामुळे पौंडावांचून अडत नाही. परंतु सुवर्णचलनांत रुपया हे खरोखरीचे उपनाणं असल्यामुळे पौंडाशिवाय मोठ्यादेण्याचे व्यवहार चालणार नाहीत. रुपयांच्या नोटा व रुपये हे कायदेशीर नाहीत असे ठरविले झणजे सोन्याच्या नाण्याचा उपयोग करणे भाग पडेल. हल्ली खुली टां- कसाळ नसल्यामुळे जे पौंड व्यापाराच्या देवघेवीत येथे येतात ते चलनाच्या कामाकरितां अपुरे होतात. त्यावरून सुवर्णचलन के- व्यासही हल्लीप्रमाणेच स्थिति राहील व लोक पौंडाचा उपयोग फक्त संचयाकरितांच करतील असें ह्मणणं वालिशपणाचे आहे. हल्लींच्या स्थितीचा आधार घेऊन सुवर्णचलनांविषयीं विधाने करणे है तर्कशास्त्राच्या विरुद्ध आहे.
 चेंबरलेन कमिशनचें मत असं होतें कीं, सुवर्णचलन केल्यास लोक पौंड वापरतील व त्यामुळे नोटांचें चलन कमी होईल. परंतु है विधान करतांना नोटा या हल्लीप्रमाणे रुपयांच्या नोटा आहेत असे कमिशननें गृहीत धरले परंतु हे सुवर्णचलनाच्या व्याख्येच्या विरुद्ध आहे. सुवर्णचलनांत रुपयांच्या नोटा असणं शक्य नाही. नोटा या मुख्य नाण्यावर आधारभूत असतात व मुख्य नाणे पौंड हे झाल्यास सर्व नोटांचा आधार पौंड हाच असला पाहिजे. असे झालें ह्मणजे पौंड हे फक्त लहान किंमतीस देण्याकरितां वापरले