पान:रुपया.pdf/241

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २३८)

१८९३ साली टांकसाळ बंद केली त्या वेळेसही अनेक व्यापारी व कित्येक सरकारी अधिकारी यांनी सोन्याचे नाणे करणे हाच उत्तम पक्ष आहे असे मत दिलें. असे असतां लोकमत सुवर्ण- चलनांस अनुकूल नाहीं असे ह्मणणें हें चमत्कारिक दिसतें. कदा- चित या आक्षेपकांचें असें ह्मणणें असेल की शेकडा ८० लोक गरीब असल्यामुळे व त्यांचे व्यवहार दहा वीस रुपयांच्या आंतील असल्यामुळे त्यांना पंधरा रुपयांच्या किंमतीइतकें मोठें नाणें वाप- ण्याची केव्हांही गरज पडत नाही. त्यांच्याकरितां रुपया हेंच सापन सोईचें आहे व पौंड हे चलनांत आल्यास त्यांना पुनः पौंडाची मोड करून रुपये वापरणेंच भाग पडेल. यांवर उत्तर इतकेंच की, सामान्य लोकांकरितां रुपये हे राहतीलच.सुवर्ण- चलनांत रुपये काढून टाकावे असे कोणत्याही हिंदी अर्थशास्त्रज्ञानें मटलेलें नाहीं. परंतु जेथे कारण नसतां हजारों रुपये अथवा रुप - यांच्या नोटा वापरण्यांत येतात तेथे पौंड अथवा पौंडांच्या नोटा उपयोगात आणाव्या असा सुवर्णचलनाचा अर्थ आहे. हिंदुस्था नचें दारिद्र्य हें सुबर्णचलन अमलांत आणण्याच्या विरुद्ध एक कारण देण्यांत येतें. परंतु सरकारी अहवाल वाचले असतां हिंदु- स्थान देश गरीब आहे किंवा श्रीमंत आहे याविषयी कांहींच नि- श्चित होत नाही. कांही अहवालांत असे नमूद केले आहे की, ह्या देशांत प्राप्ति, मजूसे, नफा इत्यादि वाढत असून हा देश श्रीमंत होत चालला आहे. असे असतां चलनाचा प्रश्न निघा-