पान:रुपया.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




(२०)

 यापैकी पुष्कळ मुद्दयांचे विशदीकरण पुढील चार प्रकरणांत होईलच. सध्या महत्वाचा मुद्दा हा आहे की, चंबरलेन कमिशनने सुवर्णसंलग्नचलन हेच चांगले आहे असे सिद्ध केले व १८९८ पासून फौलर कमिटीच्या सूचनांविरुद्ध सरकारने जे आचरण केले होते, त्यावर आपल्या संमत्नीचा शिक्का ठोकला. त्यामुळे, सोन्याचे नाणे बाजूलाच राहून हे मध्येच उपस्थित झाले. पूर्वीचे रुप्याचे चलन गेले व सोन्याचे झाले नाहीं. ‘न हिंदुर्न यवनः' अशी चलनाची स्थिति झाली आहे.

 अशा तऱ्हेचे चलन दुसऱ्या कोणत्या देशांत आहे व असेल तर ते कोणत्या प्रकारचे आहे हे आतां पाहू. ऑस्ट्रिया हंगेरीमध्ये मुख्य नाणे सोन्याचे असते; तरीही, खरोखरी चलनांत सोने फार थोडे असते. बहुतेक व्यवहार नोटांमध्ये चालतो. ज्यावेळेस सोने बाहेर पाठविण्याचा प्रसंग येतो, त्यावेळेस त्या देशांतील मुख्य बँक ही एका ठराविक भावाने सोने देण्याची व्यवस्था करते. निर्यात मालापेक्षां यात माल जास्त झाल्यामुळे, या देशाच्या विरुद्ध हुंडणावळ होते तेव्हां, ही बँक दुसऱ्या देशांत जे आपले सोने असते त्याच्या आधारावर लोकांस हुंड्या देते व त्यामुळे लोकांचा कार्यभाग होतो. या कारणाकरितां ही बँक, आपल्या शिलकींत ५०।७५ लक्ष पौंडपर्यंत लंडन, बर्लिन येथील बँकांवर काढलेल्या हुंड्या ठेवून देते. रशिया देशांतही अशीच पद्धति