पान:रुपया.pdf/238

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २३५ )


पौंडांमध्ये दर्शविल्या जातील. होतां होईल तो लोक मोठ्या रकमे- बद्दल नोटाच देतील; परंतु कांहीं कारणांकरितां नाण्याची जरूर लागल्यास, नोटांऐवजीं करन्सीच्या निधीमधून नाणे मिळू शकेल. अल्प किंमतीच्या व्यवहाकरितां आवश्यक तेवढे रुपये चलनांत राहतील. हुंड्या विकून स्टेट सेक्रेटरीस हल्लींप्रमाणे होमचार्जेसची रक्कम वसूल करता येईल व कौन्सिलबिलांचे पैसे येथे पौंडांत अथवा पौंडांच्या नोटांत हिंदुस्थानसरकार देईल किंवा इंपीरियल बँकच्या द्वारें तेवढी रक्कम लंडनमध्यें ड्रॅफ्ट विकून वसूल करतां येईल व ते ड्रॅफ्ट तीच बँक हिंदुस्थानांत पटवील. हल्ली उलट हुंड्या विकण्याचा जसा प्रसंग आला, असा पुन: प्रसंग आल्यास येथील इंपीरियल बँक लंडन येथील शाखेवर ड्रेफ्ट देऊन दे फेडूं शकेल. कचित् प्रसंगी रोकड पौंड पेट्यांमध्ये घालून लंडन येथे पाठवावे लागतील; परंतु असे करण्यानें विशेष हानि होणार नाहीं. पुढील साली निर्यात माल आयात मालापेक्षा जास्त झाला स्मणजे तेच पौंड पुनः येथें परत येतील.
 सुवर्णचलनास हिंदुस्थान देश विशेष पात्र आहे. येथील नि- बत आयात मालापेक्षा जास्त असल्यामुळे दर वर्षी २५/३० कोटि रुपयांचें सोनें येथें खेंचणे अगदी सोपे आहे. व अशा तऱ्हेने ५/६ वर्षे सोनें येऊं दिल्यास एकंदर दीडशे कोटीपर्यंत सोन्याचे नाणे होईल. एवढें नाणें सर्व देशास पुरेसें आहे. सुवर्णचलन केल्यास नाणें अटविण्याची प्रवृत्ति कमी होईल कारण तसे केल्यास नाण्या-