पान:रुपया.pdf/237

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २३४ )

नसतांना, हुंडणावळ कायदा करून पक्की करण्यांत स्मिथकमि- टीने अतिशय उतावीळपणा केला ही गोष्ट नाकबूल करितां येणार नाहीं. कांहीं वर्षांनी हिंदुस्थानचा व्यापार स्थिरस्थावर होऊन निर्यात माल पूर्वीच्या प्रमाणावर आल्यानंतर, सुवर्णसंलमचलन पुनः सुरळीत रीतीनें चालेल अशी पुष्कळ लोकांस आशा आहे. आमच्या मतें, गेल्या चार वर्षांतील अनुभवाने या चलनाची अस्थिरता व कृत्रिमपणा अतिशय स्पष्ट रीतीनें व्यक्त झाली आहेत. असे असतां पुनः या चलनपद्धतीवर हिंदुस्थान देशानें विश्वास ठेवणें हें अदूरदर्शित्वाचें लक्षण होईल.
 सर्व साधकबाधक मुद्यांचा विचार केला असतां, सुवर्णचलन हेच हिंदुस्थानास हितावह आहे असे दिसून येईल. ह्या चलनांत पौंड हें मुख्य नाणे करून, रुपया हें खरोखरीचें उपनार्णे केले पाहिजे. ५० किंवा १०० रुपये या मर्यादेच्या बाहेर रुपये हें कायदेशीर नाणें नाहीं असे कायद्यांत नमूद केले पाहिजे. नोटाही रुपयांवर आश्रयभूत न राहतां, सोन्याच्या नाण्यावर आश्रय धरून राहिल्या पाहिजेत. अर्थात् नोट दिली असता त्याबद्दल पौंड डिले पाहिजेत. सर्वांत महत्वाचे अंग हें आहे कीं, टांकसाळ खुली असली पाहिजे, ठराविक वजनाचें सोने दिल्यास एक नाणें पाडून दिले जाईल अशी हमी सरकारने घेतली पाहिजे.
 या चलनाचे कार्य अंतरव्यवहारांत व बाहेरच्या देशाशी होणाऱ्या व्यवहारांत कसे होईल ते आतां पाहूं. देशांमध्ये सर्व किंमती