पान:रुपया.pdf/236

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २३३ )


रुपयांवर येईना. उलट कांही दिवसांनी किंमत अधिकच होऊन. आज मित्तीस ती ३२ रुपयांच्याही पुढे गेली आहे.हिंदुस्थान देशासारख्या मोठ्या देशांत ६।७ कोटींचं सोनें विकून, सोन्याचा भाव १६ रुपयवर आणण्याचा प्रयत्न करणे अणजे आकाशान गवसणी घालण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे. याच सुमारास रु‡ही स्वस्त होऊं लागले. झणजे स्मिथकमिटीच्या हुंडणावळीस अनुकूल अशी जी अंगे होती, ती दोन्हीं प्रतिकूल होऊं लागली. सोनें स्वस्त व रुप महाग होण्याऐवजी, सोर्ने महाग व रुपें स्वस्त होऊं लागलं. सर लायोनेल अॅब्राहाम यांनी झटल्याप्रमाणे हिंदु- स्थानसरकारची गृहीतकृयें त्यांना नडू लागली. रुपें महाग राहील अशा कल्पनेवर रचिलेली इमारत ढांसळून पडली व पुनः १ पौंड = १५ रुपये असा दर करावा लागेल की काय अशी सरकारात शंका वाटू लागली. हलके हलके हुंडणावळ १ रु. = २४ पेन्स या बिंदूच्यानजीक येण्याच्याऐवजी, खाली येत येत गेल्या थोडे महिन्यांत १६ पेन्सांच्याही खाली गेली.
 अशा रीतीने स्मिथकमिटीची शिफारस कल्पनेच्या अवस्थतेच राहून, तिला मूर्तस्वरूप येणे दुर्घट झाले आहे. हा सर्व परिणाम महायुद्धानंतरच्या व्यापाराच्या व हुंडणावळीच्या अस्थिरतेर्ने घडून आला आहे हे खरे; परंतु अशी अस्थिरता असतांना न रुप्याची किंमत आहे तशीच राहील किंवा खाली जाईल हे निश्चित