पान:रुपया.pdf/235

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २३२ )

टीचा दर कायम राखण्यास सोन्याचा भाव कमी असणे व रुप्या चा भाव जास्त असणं हीं दोन्हीं आवश्यक आहेत. सरकारने एक पौंडावरोवर १० रुपये ठरविल्यास एका पौंडांत जेवढे सोने असते त्याची किंमत दहा रुपये झाली पाहिजे. परंतु बाजारांत तेवढ्या सोन्याची किंमत अठरा वीस रुपये होती. त्याचप्रमाणे रुपें स्वस्त झाल्यास रुपयाची किंमतही त्याप्रमाणे कमी होऊन पौंडांतील सोनें दहा रुपयांस मिळणार नाही. असे झाल्यास पौंड दहा रुपयाच्या ऐवजी देण्यास कोणीही तयार होणार नाहीं. सर- कारासही पौंड चलनांत आणणे कठीण होईल. त्याचप्रमाणे पौं- डाची किंमत अठरा वीस रुपये असतांना कोणतीही एक्सचेंज बँक दहा रुपये घेऊन एक पौंडाचा ड्रॅफ्ट देण्यास तयार होणार नाहीं. अशी स्थिति असल्याने सरकारने जरी हा दर ठरविला व आपले हिशेबही या दराने करण्यास सुरवात केली तरीही व्यवहारांत नवीन हुंडणावळ प्रस्थापित होईना.
 नंतर हा दर ज़बरदस्तीनें प्रस्थापित करण्याकरितां सरकारने सोनें विकण्यास सुरुवात केली. १९१९ च्या ऑगस्ट महिन्या- पासून दर महिन्यास दहा लक्ष पौंडांचे सोने याप्रमाणे तीन महिने विकले. नंतर तीन महिनेपर्यंत दर महिन्यांस १६ लक्ष पौंडांच सोनें याप्रमाणे विकलॆ. यामुळे सोन्याची किंमत ३२ रुपये तोळ्यावरून २५ रुपये तोळ्यापर्यंत खाली आली. एकंदर अद- मासँ २२ लक्ष तोळे सोनें विकलें ; तथापि सोन्याची किंमत १६