पान:रुपया.pdf/234

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २३१ )


झाले असते. असे झाल्याने लोकांचा नोटांवरचा विश्वास उडून जाऊन पुन्हां नोटांचें चलन लोकप्रिय करणे दुरापास्त झाले असते. ही आपत्ति दूर करणे हाही या कमिटीपुढे आणखी एक महत्वाचा प्रश्न होता.
 जोपर्यंत रुपयाचा पौंडांत भाव १६ पेन्स आहे तोपर्यंत रुपयां तील रुप्याची किंमत जास्त असल्यामुळे तें अटविणे हे फायदे- शीर असते व त्यामुळें रुपये अटविले गेल्यास नोटांबद्दल रुपये देणे शक्य होणार नाहीं. रुपये अटविल्यामुळे कमी पडल्यास लोक नवीन नोटा करन्सीच्या निर्धीमधून मागतील व असा क्रम २/३ वर्षे चालल्यास सर्व निधि नाहींसा होईल. याकरितां रुप- याचा भाव २४ पेन्स ( सोनें ) करण्याचें स्मिथ कमिटीनें ठरविलें. २४ पेन्स भाव केल्यानें रुपयाची किंमत त्यांतील रुप्याच्या किंम तीपेक्षा जास्त होईल व रुपये अटविण्यांत फायदा न होतां नुक- सान होईल. त्याचप्रमाणे २४ पेन्स (सोनें) हा भाव ठरविल्याने हुंडणावळीची स्थीरताही साध्य होईल. कारण २४ पेन्स दिल्यास एक रुपया देणे केव्हांही अशक्य नाही. अशा सर्व कारणांकरितां स्मिथ कमिटीनें एक रुपयाबरोबर २४ पेन्स हा भाव कायम कर ण्याविषयी शिफारस केली. कमिटीचा अहवाल प्रसिद्ध झाल्या- नंतर स्टेट सेक्रेटरींनी त्याबरहुकूम ताबडतोब अंमलबजावणी कर ण्याचं ठरविलें. वस्तुतः रुप्याचा भाव अस्थिर असतांना काय मची हुंडणावळ ठरविणें अतिशय साहसाचे होते. स्मिथ कमि