पान:रुपया.pdf/233

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २३० )

सर्वच अवयव विस्कळित होतील. अशा अनेक आपत्ति हल्लींच्या पद्धतीमुळे उत्पन्न होत असल्याने ही पद्धति बदलून टाकून सुवर्ण- एक चलनपद्धति अस्तित्वांत आणावी असे बहुतेक हिंदी अर्थशास्त्र- ज्ञांचे मत झाले आहे. सोन्याचें नाणें केल्यानें आतांपर्यंत वर्णन केलेले सर्व कृत्रिमतेचे दोष सहजच लुप्त होतील व हिंदुस्थानांतील पद्धति इंग्लंडांतील पद्धतीप्रमाणे नैसर्गिक व बाह्य उपाधीपासून अलिप्त होईल. या पद्धतीचं समर्थन करण्यापूर्वी, स्मिथ कमिटीन हल्लींचीच पद्धति नवीन पद्धतीशी जुळेल अशी करण्याविषयीं जे प्रयत्न केले आहेत त्यांचे परीक्षण करणे आवश्यक आहे. ह्या कमिटीच्या सूचना हिंदुस्थानसरकारने मान्य केल्यामुळे त्यांना विशेष महत्व आलेले आहे.
 ही कमिटी १९१९ च्या मे महिन्यांत नेमिली गेली. हुंडणा- वळ ची स्थीरता रुप्याच्या वाढत्या किंमतीमुळे नाहींशी जाहली होती, ती पुनः पूर्वस्वरूपावर आणणे हा या कमिटीपुढील मुख्य प्रश्न होता. हैं करण्याकरितां रुपयाची किंमत वाटेल त्या बिंदूप- र्यंत नेण्याची हिंदुस्थानसरकारची तयारी होती. रुपया हें उप- नाणं राहिलंच पाहिजे असाही हिंदुस्थानसरकारचा मुख्य सिद्धांत होता व सुवर्ण संलग्नपद्धतीप्रमाणे हा सिद्धांत बरोबर होता. १९१८ मध्ये नोटांच्या निधीची स्थिति फार धोक्याची झाली होती. लोकांनी मागणी केल्यामुळे त्यांतील रुपये अतिशय कमी वाले होते व जास्त मागणी झाल्यास नोटांचे रुपये देणे अशक्य