पान:रुपया.pdf/232

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२२९)

येथील सरकारांच्या मदतीनें रुप्याची किंमतं ' कंट्रोल' केल्यामुळे स्थिर राहिली; परंतु हें नियमन बंद केल्याबरोबर रुप्याची किंमत एका तळ्यास ३२ पेन्सपर्यंत गेली. असे झाल्याने, हुंडणावळ १ पौं. = १५ रु. होती ती १ पौं.= ८ रु. अशी करावी लागली. अर्थात् १रु = ३० पेन्स असे रुपया व पेन्स यांमधील गुणोत्तर झालें.
 परंतु हुंडणावळ स्थिर ठेवणें हें प्रचलित पद्धतीचें मुख्य अंग असल्यामुळे रुपयास उपनाण्याचे स्वरूप प्राप्त होण्याकरितां एक रुपयाची किंमत त्यांतील रुप्यापेक्षाही जास्त राहील असें नवीन प्रमाण ठरविणे भाग पडलें. रुप्याच्या किंमतीची कमाल मर्यादा एक वारांश पौंड ( सोनें- स्टर्लिंग नव्हें) ह्मणजे पौंडांत जे सोने असतें त्याचा एक बारांश हिस्सा अंशी ठरवून, हे नवीन प्रमाण एक रुपयास एक दशांश पौंड (सोन्याचा) असे स्मिथ कमिटीन ठरविलें. रुपें महाग असल्याने हे प्रमाण प्रचलित पद्धति कायम ठेवण्यास आवश्यक होतें. परंतु रुपें पूर्वीप्रमाणे स्वस्त झाल्यास (ह्मणजे एका तोळ्यास १०।९२ पेन्स असा दर झाल्यास ) ही हुंडणावळ अतिशय उच्च बिंदूवर राहील. रुपयाची किंमत अद- मासे १ । शिलिंग असतां त्याची कायदेशीर किंमत २ शिलिंगांपेक्षां- ही जास्त होईल असे झाल्यास कौन्सिल बिलें कोणीही विकत घेणार नाहीं व होमचार्जेस वसूल करण्यास स्टेट सेक्रेटरीस एखादा नवीन मार्ग काढावा लागेल. अशा रीतीनें सुवर्ण संलग्नचलनाचें