पान:रुपया.pdf/231

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २२८ )

 १८९८ साली फौलरकमिटीनें जो ऊहापोह केला, त्यांत रुपें हैं नेहमी स्वस्त राहील व त्यामुळे रुपयाची धात्वात्मक किंमत ११।१२ आण्यांच्या पलीकडे कधींही जाणार नाहीं असे गृहीत धरले होते. सुदैवाने अशा तऱ्हेची स्थिति महायुद्धापर्यंत राहिली हैं खरें आहे; तथापि एकाच तऱ्हेच्या गृहीतकृत्यावर एका मोठ्या देशाची चलनपद्धति आधार धरून राहील असे मानणे हैं कोत्या बुद्धीचे द्योतक आहे. सर लायोनेल अॅब्राहाम यांनी, स्मिथकमिटीपुढे साक्ष देतांना असे सांगितले की, "या सर्व वादामध्ये हिंदुस्थानसरकारचा एक मोठा प्रमाद दिसून येतो तो हा कीं, भविष्यकालाविषयी अमुक तमुक, हे असे होईल या प्रमाणं गृहीतकृत्यें त्यांनी केली; परंतु असें करण्यास मुळींच आधार नाही. "अशाच तऱ्हेचा प्रमाद फौलरकमिटीने केला व रुप हैं कधींही महाग होणार नाहीं असे गृहीत धरलें.
 १९९६ मध्ये रुप्याची किंमत वाढू लागली व सरतेशेवटी ती इतकी वाढली की, रुपयाची धात्वात्मक किंमत कायदेशीर किंम- तीपेक्षा जास्त झाली. त्यामुळे रुपये अटविणे किंवा बाहेर पाठ- विणे हे फायदेशीर होऊं लागले. १९१७ च्या ऑगष्टमध्ये एक तोळा रुप्याची किंमत १४- झाली. त्यामुळे सुवर्णसंलमचलनाचे मुख्य तत्व डांसळून पडलें. एक रुपयाची किंमत १६ पेन्सां- पेक्षां अधिक झाली आणि रुपया व पौंड यांमधील प्रमाण कायम टेवर्णे अशक्य झाले. कांहीं काळपर्यंत इंग्लंड व युनायटेड स्टेट्स